📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वासोळ इंदिरा माध्यमिक विद्यालयात आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन

 प्रशांत गिरासे |  वासोळ

वासोळ- येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान प्रत्येक भारतीयाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवायचा असल्याने ध्वजसंहिते विषयी जाणीव जागृती व्हावी यासाठी सदर फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या. मुख्याध्यापक आर .जी. देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत ध्वजसंहिते विषयी माहिती दिली. यावेळी इंदिरा माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक,शिक्षक व  प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक,  उपस्थित होते.सदर रॅली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  उपशिक्षक शिर्के एस.यु, बागुल बी.जी,श्रीमती.गुजर एस.एन,श्री.पाटील एस.एम, श्री.सावकार जे.एनं ,श्री.सावंत व्ही.बी, श्री.वाघ ए.एल, श्री.ठाकरे एस.डी. आदींसह सर्व सेवक वृंदांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती बागुल सर,गुजर मॅडम,ठाकरे सर ,वाघ सर  यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने