भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत त्याच अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण पोलीस दलातर्फे नाशिक ते येवला 75 किलोमीटर दौड रेल्वे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी सात वाजता नाशिक औरंगाबाद महामार्गावरील संत श्री जनार्दन स्वामी महाराज मठ तपोवन कमान नाशिक येथून महापालिका आयुक्त चंद्रकांत फुलकोंडवार व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सदर दौडचा प्रारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस खेळाडू यांनी हातात तिरंगा घेऊन नाशिक ते येवला ७५ किलोमीटर आंतर रेल्वे पद्धतीने धावून पूर्ण केले सदरील दौड ही तपोवन नाशिक येथून प्रारंभ होऊन ओढा चांदोरी निफाड नैताळे विंचूर देशमाने व येवला असे सुमारे ७५ किलोमीटर आंतर पूर्ण करून पार पडली
यावेळी नाशिक जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी पोलीस कुटुंबीय तसेच स्थानिक नागरिकांनी रॅली मार्गावर ठिकठिकाणी उपस्थित राहून सहभाग नोंदविला सदर दौडू मधील सहभागी पोलीस धावपटूंनी उत्साहाच्या वातावरणात 75 किलोमीटर अंतर पूर्ण करून येवला येथील बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी स्मारक येथे अभिवादन करून रॅलीचा समारोप केला
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांचे माध्यमातून देशातील स्वातंत्र्य सेनानींच्या स्मृतींना उजाळा देऊन एकात्मतेचा संदेश नागरिकांमध्ये त्याचे तरुण पिढींना दिला जाणार आहे असे यावेळी पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील यांनी सांगितले
सदर कार्यक्रम प्रसंगी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस खेळाडू मंत्रालयीन कर्मचारी वृंद सेवानिवृत्त पोलिस अंमलदार पोलीस कुटुंबीय तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव शालेय शिक्षक व विद्यार्थी असे मोठ्या संख्येने उपस्थित होते