आई वडिलांचे छत्र हरपलेल्या लेकरांना मिळेल का मायेचा व मदतीचा हात !
राकेश आहेर:- (चांदवड देवळा)
देवळा तालुक्यातील मेशी येथील माहेरवाशीण असलेल्या भागाबाई शांताराम जगदाळे, यांना चांदवड येथे दिलेले होते. संसाराची दोन चाके सुरळीत चालू असतांना त्यांचे पती शांताराम पोपट जगदाळे यांचा ८/६/२०१९ रोजी मृत्यू झाला. आणी तेथुनचं त्यांच्या अधोगतीला सुरुवात झाली. परिस्थिती अतिशय बेताची असल्याने भागाबाई जगदाळे यांनी परत मेशी गाठली, भाड्याची खोली घेऊन तीन वर्षे मोलमजुरी करून आपल्या लेकरांना मोठे केले. पण भांग्याने त्यांचीही साथ सोडली परिश्रम कष्ट करत असतांना शरिराचा कस अक्षरक्षा निघून गेला त्यांना दमाचाही आजार होता, आजारी पडुन त्या अगदी काठीगत बारीक पडल्या होत्या, तीन दिवसांपुर्वी खुपचं तब्येत खालावली होती. चार-पाच दिवसांपासून ना घरात अन्न ना पैसे, अक्षरशः तेल, ना मीठ असलेल्या फक्त भातावर आपल्या व लेकरांच्या पोटाला भर करत होत्या. दोन दिवसांपूर्वी सहावीत असलेल्या महेशने आपल्या आईला बसवर घेऊन जाऊन मालेगावचे सामान्य रुग्णालय गाठले पण उपचारादरम्यान भागाबाई यांची प्राणज्योत मावळली. प्रेयत्न करुनही आई त्या लेकरांच्या हाती काय लागली नाही.मालेगावच्या सामान्य रुगणालयातुन रुग्णवाहिकेतून भागाबाई यांना मेशी येथे आणण्यात आले तीन भाऊ आणी गावातील काही तरुण युवकांनी त्यांचा अंतीम संस्कार केला.
आधी वडील व अता आई या दोघांचेही छत्र हरपल्याने त्यांची दोघं गोंडस मुलं अता अनाथ झाली आहेत. महेश शांताराम जगदाळे सहावीत तर ओम शांताराम जगदाळे हा दुसरित मेशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत. एकीकडे वडिलांचे छत्र हरपले असतांना नातेवाईकांनीही पाठ फिरवल्याचे दिसत आहे. सारं गाव मामाचं अन् एक नाही कामाचं या म्हणीप्रमाणे त्यांचे तीन मामा गावातल्या गावात असुनही बहिणीकडे व भाच्यांनकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे मायेची आस असलेली महेश व ओम यांची मावशी लताबाई बुधा वाघ ह्या झोडगे येथील असुन त्या दोघं मुलांचा सांभाळ करण्यास तयार आहेत पण त्यांचीही परिस्थिती अतिशय बेताची आहे, शिवाय त्या एका हाताने अपंग सुद्धा आहेत.जरी मावशीने या लेकरांचा सांभाळ केला तरीसुद्धा त्यांना मदतीची खुप अवशक्यता आहे. एकीकडे आपला कृषी प्रधान देश असुनही हौस-मौस तर दुरचं पण अशा अनेक कुटुंबांना दोन वेळचे अन्नही मिळू नाही का ही एक शोकांतीकाच आहे.
आता कुठलाही आधार नसलेल्या या चिमुकल्यांना मदतीची गरज असुन या बातमीव्दारे आवाहन करण्यात येते की परिसरातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे करावे व सामाजिक बांधिलकी जपत त्यांना सर्वतोपरी मदत करावी हीच आशा....