📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

घरावर लावण्यासाठी 21 रुपये शुल्क भरून मिळणार राष्ट्रध्वज; 'महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात ' संपर्क साधा

मालेगाव महानगरपालिका मालेगाव
हर घर तिरंगा या उपक्रमासाठी तिरंगा ध्वज उपलब्ध करून घेणे कामी जाहीर आवाहन 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “ हर घर तिरंगा ” हा उपक्रम व शासनाच्या निर्देशान्वये दिनांक 13 ऑगस्ट, 2022 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत राबविणे कामे प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय निम शासकीय /खाजगी आस्थापना/ सहकारी संस्था/ शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर तीन दिवस घरोघरी राष्ट्रध्वजाची उभारणी करून तिरंगा फडकवणे कामी नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय निमशासकीय/ खाजगी आस्थापना/ सहकारी संस्था/ शैक्षणिक संस्था, (सार्वजनिक वाचनालय, पत्रकार संघटना, न्यूज संघटना, न्यायालयीन संघटना, व्यापारी संघटना, पावरलूम संघटना, सायजिंग संघटना, कारखाने संघटना, सामाजिक व सोशल वर्कर संघटना, राजकीय संघटना, शिक्षण संस्था संघटना व इतर सर्व उर्वरित संघटना यांच्या इमारतीवर ध्वज उभारणी कामे आवश्यक तिरंगा ध्वज उपलब्ध करून देणे कामे मालेगाव महानगरपालिके मार्फत खालील प्रमाणे पाच ठिकाणी ध्वज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
१) प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ०१, मोसम पूल, छावणी पोलीस स्टेशन शेजारी, मालेगाव
२) प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ०२ आयशा नगर, आयेशानगर पोलीस स्टेशन जवळ, मालेगाव
३) प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ०३ नवापूरा, भिकू चौक, मालेगाव 
४) प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ०४ नांदेडी स्कूल, शब्बीर नगर, मालेगाव 
५) संकीर्ण कर विभाग, मालेगाव महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीसमोर भुईकोट किल्ले शेजारी, मालेगाव 

उपरोक्त प्रमाणे रहिवासी कार्यक्षेत्रातील उक्त पाच ठिकाणी मालेगाव मनपाकडून मागणी करणाऱ्यांना तिरंगा ध्वज उपलब्ध करून देणे कामी व्यवस्था करण्यात आलेली आहेत त्यासाठी खालील प्रमाणे देण्यात आलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.
१) श्री जगदीश बडगुजर, प्रभाग अधिकारी, प्रभाग क्रमांक ०१ मोबाईल नंबर 81 80 81 39 52 
२) श्री शाम बुरुकुल, प्रभाग अधिकारी, प्रभाग क्रमांक ०२, मोबाईल नंबर 98 81 77 54 41 3
३) श्री.हरीश डिंबर, प्रभाग अधिकारी, प्रभाग क्रमांक ०३ मोबाईल नंबर 98 60 98 78 36 
४) श्री अब्दुल कदिर, प्रभाग अधिकारी प्रभाग क्रमांक ०४ मोबाईल नंबर 98 90 57 57 85
५) श्री सुनील खैरनार संकीर्ण कर अधीक्षक मोबाईल नंबर 93 26 32 51 85

शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या तिरंगा ध्वज या प्रत्येकी एका ध्वजाची किंमत 21/- रुपये इतकी निश्चित करण्यात आलेली आहे.
तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तसेच सर्व शासकीय/ निमशासकीय, खाजगी आस्थापना /सहकारी संस्था शैक्षणिक संस्था (सार्वजनिक वाचनालय, पत्रकार संघटना, न्यूज संघटना, न्यायालयीन संघटना, व्यापारी संघटना, पावरलूम संघटना, सायजिंग संघटना, कारखाने संघटना, सामाजिक व सोशल वर्कर संघटना, राजकीय संघटना, शिक्षण संस्था संघटना व इतर उर्वरित सर्व संघटना) या सर्वांनी ध्वजसंहितेचे पालन करून कार्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारणे कामी प्रति तिरंगा ध्वज 21/- रुपये प्रमाणे मालेगाव मनपाच्या उक्त पाच ठिकाणी भरणा करून उपलब्ध करून घेणे कामी  आयुक्त - प्रशासक भालचंद्र गोसावी मालेगाव महानगरपालिका यांच्या वतीने सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने