📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यातील 13 ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल घोषित

 
 प्रशांत गिरासे | ज्ञानेश्र्वर आढाव | राकेश आहेर
  देवळा 

देवळा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या, मतमोजणी देवळा तहसील कार्यालयात करण्यात आली. एकूण 13 ग्रामपंचायतच्या निवडणुकी मध्ये 41उमेदवार बिनविरोध झाले. 
13 गावांची मतमोजणी देवळा तहसील कार्यालयात पार पडली तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आल्याने पोलीस प्रशासन ही सज्ज झालेली दिसून येत आहे.

देवळा तालुका तहसीलदार विजय सूर्यवंशी निवडणूक नायब तहसीलदार विजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणी झाली

मतदानाची आकडेवारी
ग्रामपंचायतनिहाय झालेले मतदान असे, 
पिंपळगाव (वा)८३.२६ टक्के
खुंटेवाडी  ८२.०८ टक्के, 
सावकी ८८.१३ टक्के,
गुंजाळनगर ८८.८७ टक्के
वाखारी ८१.०२ टक्के, 
खर्डे ८४.८३ टक्के, 
खडकतळे ,९०.६५ टक्के,
शेरी ८८.२२ टक्के,
वार्शी  ८७.०६ टक्के,
विजयनगर ९०.८८, 
सुभाषनगर ९८.९५%, 
कापशी ८९.९७%, 
रामेश्वर ८३.३८%,

नाशिक जिल्हा - 40 ग्रामपंचायत निकाल

निफाड - राष्ट्रवादी 1
येवला - राष्ट्रवादी 2, भाजप 1, ईतर 1
सिन्नर - राष्ट्रवादी 1, शिवसेना 1
देवळा - भाजप 9, प्रहार 1, ईतर 3
बागलाण - भाजप 5, राष्ट्रवादी 5, ईतर 3
नांदगाव - ईतर 3, शिंदे गट 3
चांदवड -  1 प्रहार


• राज्यातील सत्तांतराचे ग्रामपंचायत 
• निवडणुकीवर पडसाद...
• स्थानिक आमदारांचे वर्चस्व वाढले...
• शिंदे-भाजप गट जोमात..

राज्यात घडलेल्या संत्तातंर नाट्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटलेले पहायला मिळाले. शिंदे-भाजप गटाचे वर्चस्व निकालात पहायला मिळाले. देवळा-चांदवड तालुक्यातील १४, नांदगाव तालुक्यातील ५, येवला ४ आणि सटाणा-बागलाण तालुक्यातील १० असे एकूण ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुक पार पडल्या. झालेल्या मतदानेची आज मतमोजणी करण्यात आली. त्यात येवल्यात माजी मंत्री छगन भुजबळ,नांदगावला आमदार सुहास कांदे, देवळा-चांदवड तालुक्यात भाजप आमदार डॉ. राहुल आहेर तर सटाणा, माजी आमदार संजय चव्हाण, विद्यमान आमदार दिलीप बोरसे या आमदारांचे समर्थक जास्त प्रमाणात निवडून आले आहेत.
शुक्रवारी (दि.५) सकाळपासून टप्प्या-टप्प्याने निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष करण्यात आला. त्यामुळे सर्वच तालुक्यात विद्यमान आमदारांचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत सर्वात जास्त धक्कादायक निकाल चांदवडच्या दहिवत येथे लागला असून येथे ७ पैकी ५ जागांवर प्रहार संघटनेचे तर २ जागांवर बहुजन वंचितचे उमेदवार निवडणून आले एका प्रकारे भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांना धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे सर्वच ठिकाणी मतदारांनी नवीन आणि तरुण उमेदवारांना संधी देऊन प्रस्थापिना धक्का दिला आहे.निकाल लागल्यानंतर विजयी झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला ग्रामपंचायत निवडणुकीत नाशिकच्या ग्रामीण भागात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने खाते उघडले आहे.सत्तांतरानंतर जिल्हाभरात झालेल्या निवडणुकांवर प्रभाव दिसून आले.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने