📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मोठा अनर्थ टळला : प्रसंगावधान राखत असंख्य बालकांसह स्वत:चा तसेच परिसरातील नागरिकांचा वाचवला जीव,

अंगावर काटा येण्यासारखी घटना आज लोहणेर येथे घडली आहे , अंगणवाडी कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत असंख्य बालकांसह स्वत:चा तसेच परिसरातील नागरिकांचा जीव वाचवलाय , लोहोणेर येथील राममंदिर अंगणवाडी  क्र.5 मध्ये  सुनिता शेवाळे व मदतनीस अर्चना वाघ हे लहानबालकांसाठी गॅसशेगडीवर पोषण आहार शिजवत असतांना अचानक सिलेंडरने पेट घेतला, त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ,  त्यावेळी अंगणवाडीत वय 3ते 6 वयोगटातील  35 लहान बालक,2 गरोदर महिला  तसेच इतर बालकांच्या माता होत्या,  सदर आग पेट घेत प्रसंगावधान राखत  कार्यकर्ती व मदतनीस यांनी  सर्व बालकांना बाहेर काढुन आजुबाजुच्या नागरिकांना आवाज देऊन आग विझवण्यासाठी त्वरित यांच्याकडील अग्निशमन साधन  उपलब्ध केल्यामुळे आग आटोक्यास आणण्यास मदत झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला 
शेजारीच आदिवासी मोठी लोकवस्ती देखील होती आग आटोक्यास आणण्यासाठी सरपंच सह ईतर नागरिक व अंगणवाडी सर्व कार्यकर्त्या व मदतनीस हजर होते.
सदर घटनेची ची शासनाने दखल घेऊन त्वरीत अंगणवाडीत आहार शिजवणे बंद करून आधी प्रमाणेच बचत गटाकडे आहार शिजवण्यास देण्यात यावा मागणी सरपंच रतिलाल परदेशी यांनी शासनाकडे मागणी केली आहे 




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने