📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी अखेर संजय राऊतांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून अटक

 मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी अखेर संजय राऊतांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून अटक झाली आहे. दिवसभराच्या मारेथॉन चौकशी नंतर मध्यरात्री ईडीने संजय राऊतांना अटक केलेय. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या विक्रोळी येथील निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले 
काय आहे पत्रा चाळ घोटाळा?
संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांना या घोटाळा प्रकरणात ईडीनं अटक केलीय. आणि सध्या ते कोठडीतच आहेत. राऊतांच्या मागे पत्राचाळ प्रकरण आणि 55 लाखांच्या व्यवहारामुळं ईडी लागलीय, गोरेगावच्या सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला. 13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं. . मात्र जमिनी गुरु आशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं. पत्राचाळ प्रोजेक्ट संदर्भात 13 मार्च 2018ला म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याकडून तक्रार करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने