मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज मालेगावमध्ये आहेत. 'शासन आपल्या दारी' या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून मालेगावमधून सुरुवात झाली आहे.
तमाम मालेगावकरांना आज मुख्यमंत्री मालेगाव जिल्ह्याची घोषणा करतील अशी अपेक्षा होती , परंतु फक्त आश्वासन देत आपण मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत सकारात्मक आहोत असे सांगितले
( Chief Minister Eknath Shinde is currently on a state tour and is in Malegaon today. The Maharashtra tour of 'Shasan Apya Dari' has started from Malegaon from today.
All the Malegaoners were expecting that the Chief Minister would announce the Malegaon district today, but he only gave an assurance and said that he is positive about the formation of the Malegaon district. )
मालेगाव जिल्हा निर्मिती व्हावी हि मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील चर्चा केली. हे सरकार पूर्णपणे सकारात्मक हे असून लवकरच या बाबतीमध्ये मंत्रालयामध्ये बैठक मालेगाव जिल्हानिर्मिती संदर्भात निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले
मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कॅम्प पोलीस ठाणे व २०५ पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काष्टी (मालेगाव) येथील कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दादाजी भुसे उपस्थित होते.
लवकरच रिक्षावाले, फेरीवाल्यांसाठी महामंडळ उभारणार असून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले आहेत. . त्यांच्या मुलांचे शिक्षण, वैद्यकीय सुविधा मिळून त्यांना आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. यासाठी रिक्षावाले,ड्रायव्हर असतील त्यांच्यासाठी एक महामंडळ तयार करण्याची विनंती केलेली आहे, सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम हे महामंडळ करेल. उदय सामंत आणि दादा भुसे यांच्यावर त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे
तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान देणार असून,अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान 100 टक्के पंचनामे झालेलं आहेत, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये रेगुलर कर्ज फेड करणाऱ्यांना अनुदान, तसेच पेट्रोल पाच रुपये डिझेलवर तीन रुपये कमी केले. तसेच पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी दुष्काळी भागातील जमीन सिंचनाखाली जमीन आणण्यासाठी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मालेगाव महापालिकेचे अमृत योजना टप्पा दोनसाठी 86.66 कोटी आणि मल निस्सारण योजना टप्पा दोन 469 कोटी प्रस्तावित आहेत, याला देखील तातडीने मान्यता दिली जाईल. पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा विषय असून राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने हे प्रकल्प पूर्ण होतील.
नियमित कर्ज फेड करणाऱ्या बचत गटांना देखील सरसकट व्याजदरामध्ये सवलत देण्याची मागणीवर सरकार सकारात्मक भूमिका घेईल. पावरलूम व्यवसायामध्ये देखील ज्या काही अडचणी आहेत. त्या देखील सोडवण्याचं काम आपलं सरकार करेल. तसेच कांदा पिकाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याची देखील मागणी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
यावेळी कॉलेज ग्राउंडवर सभेत झालेल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली, ठाकरेंसमोर अनेक वेळा भूमिका मांडल्या, परंतु ठाकरेंनी भूमिका समजून न घेतल्याने आम्ही उठाव केला. आम्ही उठाव केल्यानंतर आमच्यावर नको नको ते आरोप केले गेले. शिवसेना अशीच मोठी झाली नसून शिवसेना मोठे करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी केली असेही ते म्हणाले. तसेच विश्वासघात तुम्ही केला की मी याचा विचार ठाकरेंनी करावा असेही त्यांनी सांगितले.
आनंद दिघे यांनी त्यांचं आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घेतलं. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत त्यांनी शिवसेना वाढीसाठी काम केलं. पण त्यांच्याबाबतीत खूप राजकारण झालं. धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत जे घडलं, त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांच्यासोबत घडलेल्या घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. त्यांच्यावर ओढावलेले प्रसंग देखील मी पाहिले आहेत. मी ज्यादिवशी माध्यमांना मुलाखत देईन, त्यादिवशी राज्याच्या राजकारणात भूकंप होईल. सध्या मी काही बोलणार नाही. पण समोरुन जर तोंड उघडलं गेलं तर मी पण शांत बसणार नाही", असा इशारा देतानाच मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बंड करुन पेठून उठा हीच त्यांची शिकवण असल्याचं एकनाथ शिंदे सांगायला विसरले नाहीत.
%20(1).jpg)




