📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

चांगुलपणा नडला,तरुण सामाजिक कार्यकर्त्याची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या

चांगले असणे , सर्वांची मदत करणे तुम्हाला आयुष्यातून उठवू शकते , अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील नाना पेठेत घडली आहे, जुन्या वादातून एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे.
सोमवारी रात्री बारा साडेबाराच्या वाजेच्या सुमारास घडली असून त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्ये कैद झाली आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे
अक्षय वल्लाळ असं हत्या  झालेल्या तरुणाचे नाव असून तो सामाजिक कार्यकर्ता आहे. याप्रकरणी पुण्याच्या समर्थ नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. महेश नारायण बुरा आणि किशोर अशोक शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

मयत अक्षय हा नाना पेठेत तर आरोपी देखील त्याच परिसरात राहतात हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत  ज्या परिसरात राहायचे त्या ठिकाणी दादागिरी करायचे. तर अक्षयची समाजात चांगला माणूस म्हणून ओळख होती, लोकांच्या अडीअडचणीला तो धावून जात होता, चांगल्या लोकात त्याची उठबस होती,  नेमके हेच आरोपींना पाहवत नव्हते त्याची समाजातील चांगली ओळख आरोपीच्या डोळ्यात सलत होती याच गोष्टीवरून दोघेही त्याच्यावर चिडून असायचे त्यामुळे त्यांनी अक्षयचा काटा काढायचे ठरवून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वर करीत त्याला गंभीर जखमी केले दरम्यान सोमवारी मध्यरात्री अक्षय हा नानावाडा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी बेसावध असलेल्या अक्षय याच्यावर प्राण घातक हल्ला केला. इतकेच नाही तर तो गंभीर अवस्थेत खाली पडल्यानंतर सुद्धा सिमेंटच्या ब्लॉकने त्याच्या डोक्यात देखील वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
 व्हिडियो बघा 




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने