📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा : आरक्षण सोडतीकडे नजरा लावून बसलेल्या इच्छूकांचा हिरमोड

देवळा (ज्ञानेश्र्वर आढाव)ग्रामीण जनतेसाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 3 गट व पंचायत समितीच्या 6 गणांच्या आरक्षणाची सोडत झाली. 

इच्छुकांनी मात्र आपल्या सोयीचे आरक्षण पडावे यासाठी देव पाण्यात घातले होते. त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे
आरक्षण सोडतीमध्ये कुणाचा पत्ता कट होणार, तर कुणाला लॉटरी लागणार याकडे लक्ष लागून राहिले होते.

जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुक आरक्षण सोडत, पंचायत समिती सहा गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

१) खर्डा गट - अनु. जमाती महिला 
 - खर्डा गण- नागरीकांचा मागास प्रवर्ग 
- वाखारी गण- सर्व. महीला

२) उमराणा गट - अनु. जमाती पुरुष 
- उमराणा गण- सर्व. महीला 
- मेशी गण - अनु. जाती महिला

३) लोहोणेर गट - अनु. जमाती पुरुष
- लोहणेर गण - सर्व साधारण
- खालप गण_ अनु. जमाती

याप्रमाणे आरक्षण सोडत निघाल्यामुळे इच्छुकांबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांचा ही हिरमोड झाला असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे

नाशिक जिल्हा परिषदेचे सध्याचे ७३ गट असून, पंचायत समितीचे १४६ गण आहेत. नाशिक जिल्ह्यात दोन महापालिका, आठ नगरपालिका, सात नगरपंचायती असून शहरी भाग वगळता ग्रामीण भागात जिल्हा परिषद हीच एकमेव मोठी संस्था कार्यरत आहे. सुमारे ४० लाख लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करतानाच त्यांच्या आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, विकास कामांची जबाबदारी जिल्हा परिषदेवर निश्चित करण्यात आली असली तरी, पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती अशी रचना करण्यात आली आहे. साधारणत: चाळीस गावे मिळून एक जिल्हा परिषदेचा गट व पंचायत समितीच्या गणासाठी दहा ते बारा गावे गृहित धरण्यात आली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने