📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव महानगरपालिकेमध्ये कारगिल विजय दिनी माजी सैनिकांचा मेळावा

*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मालेगाव महानगरपालिकेमध्ये कारगिल विजय दिनी माजी सैनिकांचा मेळावा*
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून माननीय केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे निर्देशानुसार माजी सैनिकांचा मेळावा दिनांक 26 जुलै, 2022 म्हणजेच *'कारगिल विजय दिवस'* रोजी सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सदरच्या मेळाव्यात माजी सैनिकांना तसेच शहिदांच्या विधवा पत्नी यांना मालेगाव महानगरपालिकेच्या मालमत्ता करा मधील सर्वसाधारण करत माननीय शासनाचे निर्देशानुसार सूट देण्यात येणार आहे, अशा प्रकारची सूट यापूर्वी 2017 मध्ये मालेगाव महानगरपालिकेने माजी सैनिकांना व शहीद सैनिकांच्या पत्नींना शासन निर्णयानुसार देण्यात आलेली आहे. याबाबत मालेगाव तालुका माजी सैनिक संघटना मालेगाव यांना पत्र दिलेले असून सन 2017 नंतर सेवानिवृत्त झालेल्या अथवा शहीद सैनिकांच्या पत्नीने दिनांक 26/ 7/2022 रोजी  मालेगाव महानगरपालिकेच्या सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता उपस्थित रहावे, ही विनंती. या ठिकाणी मालमत्ता करा च्या सर्वसाधारण करांमध्ये सूट देणे बाबत सविस्तर माहिती देण्यात येईल. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घेणे बाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी आवाहन केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने