प्रशांत गिरासे | वासोळ
लोहोणेर-येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वाय.यु. बैरागी हे होते तर पर्यवेक्षक बी.के.जाधव व शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेतील प्रथम क्रमांक आलेल्या अनुष्का सुनिल दशपुते व हर्षाली अशोक बच्छाव यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक वाय. यु. बैरागी यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्या साठी केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिल एखंडे यांनी केले.