📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

SSC-HSC बोर्डात नापास होणाऱ्यांसाठी पुरवणी परीक्षा, वेळापत्रक जाहीर

मालेगाव (दिनेश पगार) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. १७) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर झाला. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसारमाध्यमांना सर्व निकालाची माहिती दिली. या वर्षीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. कोकणात सर्वाधिक निकाल लागला आहे.बारावी आणि दहावी या दोन्ही वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने महत्वाची माहिती दिली आहे. जुलै-ऑगस्ट २०२२मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता. २०) मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.यानुसार 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. तर 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने