📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

लोहोणेर जनता विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गिरवले योगाचे धडे

प्रशांत गिरासे - वासोळ

लोहोणेर  येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख,शालेय समिती सदस्य डॉ.सुभाष आहेर आदींसह मुख्याध्यापक वाय.यू. बैरागी व पर्यवेक्षक बी.के.जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक वाय.यू बैरागी यांनी केले तसेच एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक एन. एस.आहिरे,एस.डी.ठाकरे व एस.बी.एखंडे आदींनी  विद्यार्थ्यांना दंड स्तिथीतील,बैठी स्तिथीतील,पोटावर झोपून करायची आसने,कपाल भारती,प्राणायाम शांतीपीठ आदी योगाची विविध प्रात्यक्षिके करून दाखविली.यावेळी सी.ए.वाघ, एस.एस.सावंत,जे.पी.निकम, एम.पी.बच्छाव,निखील शिंदे, सुनिल निकम,विलास गांगुर्डे आदींनी देखील योगाची प्रात्यक्षिके केली.विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके करत योगाचे महत्व समजून घेतले.यावेळी विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने