📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

के. बी. एच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने प्रात्यक्षिक

  के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प   येथे मालेगाव एन.सी.सी. विभाग सेक्टर व महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत जागतिक योग दिनाचे औचित्य साधून  योग शिक्षिका ज्योती  निकम , शोभा भावसार व डी.एन. जाधव  यांचे विद्यालयात योगासने प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व  विद्यार्थ्यांनी व   शिक्षकांनी योगासने केलीत .
    कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राचार्य प्रवीण पाटील (आबासाहेब) यांनी शरीर निरोगी ठेवायचे  असेल तर प्रत्येकाने नियमितपणे योगा केलाच पाहिजे असे  उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन करून  योगासनाचे महत्त्व पटवून दिले व योग दिनाच्या व संगीत दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपप्राचार्य राजेंद्र पाटील, उपप्राचार्य रविंद्र शिरूडे, पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजय शिंदे, ज्येष्ठ प्राध्यापिका शितल शिंदे, लेफ्टनंट बी.बी. वाघमारे, आर.ए‌ पवार, एस.ए.सांगळे, सेकंड ऑफिसर एस.बी.धोंडगे, आर‌. के‌ बोरसे रिजवान अहमद,ए.बी. रशीद यांची प्रमुख उपस्थित होती.
        विद्यालयाच्या वतीने योगशिक्षिका  ज्योती निकम,शोभा भावसार,डी.एन.जाधव यांचा सत्कार  करण्यात आला. योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात  शिक्षकांनी   व विद्यार्थ्यांनी  योग प्रात्यक्षिके केली . 
        सूत्रसंचालन आर.डी.शेवाळे व प्राध्यापिका सीमा कदम यांनी केले . प्रास्ताविक प्राध्यापिका स्मिता खैरनार यांनी केले. आभार राजेश धनवट व प्राध्यापिका श्वेता  पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.सी.सी विभागाचे प्रमुख आर. के. बोरसे, तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा व सर्व सदस्या , क्रीडा शिक्षक शशिकांत पवार , जे.टी.ठाकरे ,एस.एल. निकम , जितू बच्छाव, सुनील सूर्यवंशी, हेमंत पगारे यांचे सहकार्य लाभले.
      एकूणच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी सर्व विद्यार्थी तसेच  सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने