📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कळवाडी जवळ मांदुर्णे शिवारात विजेच्या धक्क्याने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकर्‍याचा विद्युत खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, नितीन नाना नामेकर (23) असे मयताचे नाव आहे.

 महावितरणच्या कारभाराविषयी गावकऱ्यांमध्ये संताप 
शेतातील विजेच्या खांब्यात वीज प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का लागल्याने या शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला, चाळीसगाव तालुक्यातील मांदुरने ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.  नितीनच्या शेतातून आबा माळी हे दुध काढण्यासाठी जात असतांना नितीन निपचित पडलेला दिसून आल्यानंतर त्यांनी ही गावातील ग्रामस्थांना कळवल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नितीनला आपला जीव गमवावा लागल्याने ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
 याबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने