📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

के.बी.एच. विद्यालय मालेगाव कॅम्प येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश; आदित्य देसाई ९६.६० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम

 के .बी .एच . विद्यालय  मालेगाव कॅम्प येथील दहावी चा निकाल  ९५.६४ टक्के लागला असून आदित्य देसाई ( प्रथम क्रमांक    ९६.६० टक्के),   पियुष ब्राह्मणकर व  इंद्रकांत गांगुर्डे(द्वितीय क्रमांक  ९५.८०  टक्के),  भावेश निकम,यशोधन सूर्यवंशी(तृतीय क्रमांक  ९५.६०टक्के), महेश्वर मालपुरे नयन पवार , ललित शिरोळे व प्रसाद शिनकर,कुणाल कदम(   चतुर्थ क्रमांक ९४.८० टक्के),दर्शन आहिरे व  तनिष्क नावरकर
 ४१३ पैकी ३९५विद्यार्थी उत्तीर्ण झाले  असून शाळेचा
 ९५.६४ टक्के निकाल  लागला आहे.  विद्यालयातून आदित्य देसाई या विद्यार्थ्याने ९६.६० टक्के गुण मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
     गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा विद्यालयाच्या वतीने प्राचार्य  प्रवीण पाटील, उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक नितीन गवळी,पर्यवेक्षक संजय शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालक  तसेच गुणवंत विद्यार्थी  तसेच प्राचार्य प्रवीण पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
      इयत्ता दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांनी  नेत्रदीपक यश  संपादन करून विद्यालयाचा लौकिक वाढवला आहे. सर्व यशस्वी  गुणवंत विद्यार्थ्यांचे  महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री  डॉ. प्रशांत हिरे, संस्थेचे समन्वयक  डॉ. अपूर्व  हिरे, विश्वस्त  डॉ. अद्वय हिरे- पाटील, सांस्कृतिक विभागाच्या समन्विका, विश्वस्त  संपदा हिरे, उपाध्यक्ष  बी.के. देवरे, सहसचिव तथा शालेय विकास समितीचे अध्यक्ष डॉ.व्ही.एस .मोरे ,  महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संचालक  अनिल पवार , प्राचार्य  प्रवीण पाटील,उपप्राचार्य राजेंद्र पाटील ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजय शिंदे कार्यालयीन प्रमुख  संजय सूर्यवंशी ,पांडुरंग शेलार,प्रमोद पिंपळसे यांनी अभिनंदन केले . यावेळी इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक आर.डी.शेवाळे, यु. जे. पाटील , ए.के.खेडकर ,एस.के.सुर्यवंशी के.डी.देवरे ,आर.एम.धनवट ,के.वाय.देवरे,एच.एन.सोनवणे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
     उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या  विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक बंधू भगिनी व  शिक्षकेतर बंधू यांनी  अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले व आभार राजेश धनवट यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने