📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

तुंबळ हाणामारीमुळे वाहतुकीची कोंडी, वृत्तांकन करणार्‍या पत्रकारावर मालेगावात जमावाचा हल्ला; पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल.

वृत्तांकन करणार्‍या पत्रकार शंकर वाघ यांच्यावर  मालेगावात जमावाचा हल्ला

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल

मालेगाव : दोन गटात सुरू असलेल्या हाणामारीमुळे झालेल्या वाहतूकीच्या कोंडीचे वार्तांकन करणारे येथील दिव्य मराठीचे पत्रकार शंकर वाघ यांच्यावर जमावाने हल्ला चढविल्याची घटना गुरुवारी दुपारी येथे घडली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      येथील डॉक्टर दांपत्य यांच्यात कौटुंबिक वाद सुरु आहे. गुरुवारी दुपारी डॉ. हॉस्पिटलचा ताबा घेण्यासाठी खाजगी सुरक्षा रक्षकांसह दाखल झाले. यावेळी उभय गटात वाद होऊन त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले.यामुळे मोठा जमाव जमल्याने वैद्य हाॅस्पिटलजवळील सटाणा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. पत्रकार वाघ यांनी सदर घटनेचे वृत्त संकलनासाठी आपल्या मोबाईलमध्ये दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला.याचा राग आल्याने विकी पाटील तसेच पप्पू कासवे यांच्यासह १५ ते २० अनोळखी तरुणांनी वाघ यांच्यावर हल्ला चढवला. तसेच मारहाणीचे छायाचित्र नष्ट करण्यासाठी दमदाटी करत काही काळ त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. यात वाघ यांच्या डोळ्याला इजा झाली आहे.
     याप्रकरणी वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विकी पाटील व पप्पू कासवे याच्यासह १५ ते २० अनोळखी तरुणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव करत आहेत.
फोटो सौजन्य:  समीर दोशी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने