📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

प्राथमिक शाळा सोयगाव येथे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव पुष्पगुच्छ व नवीन पुस्तके देऊन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोयगाव .तालुका - मालेगाव. येथे आज दिनांक 15 जून 2022 बुधवार रोजी शासन आदेशानुसार विद्यालयातील पहिल्या दिवसाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीलाच विद्यालयाचे मा. मुख्याध्यापिका श्रीमती सविता पवार यांनी प्रास्ताविक केले व सौ मंगला पाटील यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल घेऊन स्वागत केले त्यानंतर पुस्तक वाटप व गणवेश वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका, गावातील प्रतिष्ठित नागरिक ,पालक अध्यापक विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते त्यानंतर विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सविता पवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने