📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पुरणपोळी- आमरसाचे जेवण.. उज्ज्वल शाळेचा अनोखा उपक्रम.


मालेगाव : आज सर्वत्र शाळा सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोष्यात स्वागत करण्यात आले. सोयगाव कलेक्टर पट्टा किनो संस्थेच्या उज्ज्वल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुरणपोळी व आमरसाचे जेवण देण्यात आले. यावेळी पहिल्याच दिवशी तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पुरणपोळी व आमरसाचा आस्वाद घेतला.मुख्याध्यापिका अर्चना गरुड यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम घेण्यात आला..
सध्या सर्वत्र आंब्याचा हंगाम सुरू आहे.
घरोघरी येणाऱ्या पाहुण्यांना आमरस चा पाहुणचार होत आहे. आता हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. त्यामुळे कुटूंबातील सदस्य देखील आमरसाचा बेत आखताना दिसतात. उजवल प्राथमिक शाळा याला अपवाद ठरली आहे,,
येथील शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आमरसचा पाहुणचार देत शैक्षणिक वर्षाचा श्री गणेशा केला.
कोरोना नंतर शाळा आजच उघडल्या,, या कठीण काळातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांना आमरस भोजन दिले. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सेल्फी पॉईंट बनविण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्यांना मुखवटे देत व पुष्प देत स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रईस शेख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. कार्यक्रमास उपशिक्षक योगेश बच्छाव, स्वाती आहिरे, अमोल ठोके, निलेश पवार, संगीता गायकवाड, पूनम पवार, शीतल बेडसे, ज्योती भामरे, प्रतिभा बागुल, विकास पारखे, पल्लवी पवार आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
------------
फोटो : सोयगाव : येथील उज्ज्वल शाळेत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुरणपोळीचे जेवण देतांना शिक्षक

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने