सटाना:- येथील एकदंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला शाळेचा पहिला दिवस म्हणून सर्व विद्यार्थी पालक यांचे शाळेच्या गेटपासुन स्वागत गीत व टाळ्याच्या गडगड़ाट मध्ये जंगी स्वागत करण्यात आले.शाळेच्या पटांगनातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली सर्वांचे आगमन झाले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून व मिठाई देऊन प्रवेशोत्सव साजरा झाला व पालकांचे देखील मिठाई पुष्प देऊन स्वागत केले यानंतर पालक मेळावा घेण्यात आला याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम मुसळे यांनी आपले मनोगत मांडताना सांगितले नवीन शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबवुन विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये अधिक भर देण्याचा प्रयत्न करू व मुलांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देऊ यानंतर पालकानी देखील आपले मत मांडले व शाळे विषयी आपले समाधान व्यक्त केले यावेळी प्राचार्या - डी.सी.मोतलिंग , उपप्राचार्य- ए.एन.साळुंके ,बी.पी.पाटिल ,एस. सोनवणे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
एकदंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा
0