📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सावधान! ' इमोशनल अत्याचार' लुटारुंचा नवा फंडा!


- तुमच्या जवळच्या मित्राचे नाव घेऊन इमोशनल करत करू शकतात तुमची आर्थिक फसवणूक.

- सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्याचे सांगत केली जातेय फसवणूक.

- आई वडिलांचा एक्सीडेंट झालाय परंतु ॲम्बुलन्स वाल्याला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे आहे माझ्या जवळ कॅश आहे पण तेवढा वेळ नाही, मी वार्ड बॉयजवळ लगेच पैसे पाठवते अशी भावनीक साद घालत घातला गंडा

- भावनेच्या भरात टाकले गेले पैसे, पण नंतर फोन बंद, शिवाय असं कोणी सिविल हॉस्पिटल ला कामालाच नाही.

मालेगाव () मालेगाव मध्ये आर्थिक फसवणुकीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला असून कुणाच्याही सहजासहजी लक्षात येणार नाही असा फंडा वापरून लुटारूंची टोळी आता सामान्य नागरिकाबरोबरच, डॉक्टर, पोलीस व पत्रकारांचीही आर्थिक फसवणूक करीत आहे.
मालेगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्याचे सांगत पत्रकाराच्या पत्रकार मित्राने तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नंबर दिल्याचे सांगत, माझ्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे व ॲम्बुलन्स ला अर्जंट ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करायचे आहे आहेत, माझ्याजवळ कॅश असल्याने एवढा वेळ नाहीये की ते अकाउंट वर बँकेत जाऊन अकाउंट ला टाकू व ट्रान्स्फर करू, तुमच्या जवळ ऑनलाईन असतील तर कृपया तेवढे पाठवा ना अर्जंट मी लगेच पैसे पाठवते, असे भावनिकरित्या सांगून व अत्यंत जवळचा मित्र तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नंबर दिल्याचे सांगितल्यावर भावनेच्या भरात सदर व्यक्तीने पैसे पाठवून दिले, सदर महिला पैसे टाकल्यावर पुन्हा पुन्हा फोन करत होती, व आभार व्यक्त करत होती
सदर महिला 81495 71078 व 89832 02834, 7507459725 या क्रमांकावरून मयुरी मनियार या नावाने कॉल करते, तसेच पेटीएम वर क्यू आर कोड पाठवून पैसे पाठवण्यास सांगते.
 त्यामुळे साहजीकच लागलीच गोष्ट कोणाच्याही लक्षात येणार नाही, परंतु बराच वेळ झाला तरी अजून कोणी आले नाही म्हणून सहज क्रॉस चेक केलं तर त्यात फसवणूक झाल्याचे आढळल्याने, ताबडतोब सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली.
याआधी अश्लील कॉल, व्हिडिओ कॉल चॅट, ऑनलाइन लोन यासारखे प्रकार करत खंडणी उकळणे इत्यादी ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडले आहे, परंतु ही अत्यंत वेगळी व नामी शक्कल वापरून फसवणुकीचा हा नवीन फंडा लक्षात येण्याजोगा नाही. त्यामुळे अत्यंत चाणाक्ष व्यक्तीसुद्धा भावनेच्या आहारी जाऊन अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू शकते त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा हाच मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने