नांदगाव (प्रशांत गिरासे)तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह विजांच्या गडाडाटा मध्ये तळवाडे येथे वीज पडल्याने शेतकरी शांताराम निकम सह दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली.
नांदगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे तर वादळ वाऱ्यासह आलेल्या गडगडाटा मध्ये नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथील शेतकरी शांताराम सकारी निकम तसेच त्यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शांताराम सखाहरी निकम हे आपल्या दोन बैलांना शेतातून घेऊन जात असताना वीज पडली. तर वीज पडून शांताराम सकाळी निकम तसेच त्यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाल्याने तळवाडी परिसरासह संपूर्ण नांदगाव तालुक्यात हळ हळ व्यक्त होत आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पूर्व पावसाची सुरुवात झाली तर पावसाच्या सुरुवाती सह विजांचा ही गडगडाट झाला आहे नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथे वीज पडून तळवाडे येथील शेतकरी शांताराम सखाहरी निकम व त्यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.