📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात शिव स्वराज्य दिन साजरा


(मालेगाव)मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थी कल्याण मंडळ आणि आय. क्यू. ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान आणि महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या विविध किल्ल्यांची भित्तिचित्रे प्रदर्शित केली आणि या किल्ल्यांबद्दल माहिती देखील दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अन्सारी फर्जाना यांनी केले. प्रा.राहुल देसले यांनी आपल्या व्याख्यानात शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या संदर्भात माहितीपूर्ण व्याख्यान दिले. प्रा. मुनव्वर अहमद यांनीदेखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तस्नीम हिने केले. कु. मनताशा हिने आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने