के. बी .एच .विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथील बारावी सायन्स चा शंभर टक्के निकाल यशस्वी विद्यार्थ्यांचा व पालकांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के.बी.एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प विद्यालयाचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा ९७.९० टक्के निकाल लागला असून दरवर्षा प्रमाणे यावर्षीही विद्यालयाची उत्तुंग यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली.
महाविद्यालयाचा कला, विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल खालीलप्रमाणे.विज्ञान शाखा -निकाल - १००%
प्रथम -केतकी फकिरचंद पाटील व स्नेहा पंकज मोरे( ९१%),
द्वितीय -खुशाल विश्वास बोरसे (९०.३३%,), तृतीय-श्रुती उदय अग्रवाल (९०.१७%,)
कला शाखा निकाल - ९७.५६% प्रथम -हर्षवर्धन विजयकुमार पगार (७९.१७%),
द्वितीय-प्रियंका रवींद्र गरुड (७७.३३%), तृतीय - गायत्री विरेंद्रसिंग मगर(७५.८३%)
वाणिज्य शाखा निकाल -९४.५७% प्रथम -पूर्वा अरविंद शेवाळे (७४.८३%), द्वितीय-पायल सुनील भंडागे(७३.१३%), तृतीय-प्रियंका विजय देवरे(७१.६७%)
यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार प्राचार्य प्रवीण पाटील, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजय शिंदे, सांस्कृतिक विभागाचे राजेश धनवट, राजेंद्र शेवाळे, प्रा. पी.एन. शिंदे, प्रा महेन्द्र दासनुर, प्रा. सुभाष अहिरे, प्रा. एम.जे. पाटील ,प्रा. प्रल्हाद बच्छाव ,प्रा. आर. एम. सूर्यवंशी ,प्राध्यापिका शितल देसले. यावेळी केतकी पाटील, स्नेहा मोरे, खुशाल बोरसे, श्रुती अग्रवाल, पायल भडांगे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच पालकांनी मनोगत व्यक्त केले.प्राचार्य प्रवीण पाटील यांनी यशस्वी विद्यार्थी व पालकांचे कौतुक करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेश धनवट यांनी केले. आभार राजेंद्र शेवाळे यांनी मानले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ.प्रशांत हिरे, संस्थेचे समन्वयक माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. अद्वय हिरे, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख, संस्थेच्या विश्वस्त संपदा दीदी हिरे, विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण पाटी,उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, उपप्राचार्य राजेंद्र पाटील , पर्यवेक्षक नितीन गवळी , पर्यवेक्षक संजय शिंदे तसेच सर्व प्राध्यापक , शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेत्तर बंधू यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.