📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आर बी एच कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावीच्या उत्तम निकालाची परंपरा कायम

  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित आर बी एच कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2021- 22 मार्च/ एप्रिल मध्ये झालेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल दि. 08 जून 2022, बुधवार रोजी ऑनलाइन जाहीर झाला. दर वर्षा प्रमाणे यावर्षीही विद्यालायतील उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
    आर बी एच कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा कला आणि विज्ञान शाखेचा निकाल खालीलप्रमाणे...

 *विज्ञान शाखा -*
परीक्षेला बसलेले - 108
एकुण पास - 108
 निकाल - 100%
प्रथम कु गवळी कामिनी जनार्धन 89.67%
द्वितीय कु पगार स्नेहा शांताराम 85.83%
तृतीय कु कदम जान्हवी तुलसीदास 85.67%

 *कला शाखा -* 
परीक्षेला बसलेले - 177
एकुण पास - 170
 *निकाल - 96.04%*
प्रथम कु पवार भाग्यश्री हेमंत 89.33%
द्वितीय कु शिंदे सरीता संजय 81.50%
तृतीय कु सरदार निकिता जितेंद्र 79.67%
         कु महाले विद्या सुभाष 79.67%
        कला व विज्ञान मिळुन सरासरी *एकुण शाळेचा निकाल 97.54 टक्के* लागला आहे.
        इयत्ता 12 वी परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचा विद्यालयातील अधिकारी वर्ग, प्राध्यापक व शिक्षक बंधुभगिनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विद्यार्थिनीच्या या यशात संस्थेचे जनरल सेक्रेटरीं डॉ. प्रशांत हिरे, संस्थेचे समन्वयक  डॉ अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. अद्वय हिरे, सांस्कृतिक प्रमुख संपदा दीदी हिरे, विद्यालयातील प्राचार्या सौ कल्पना देसले, उपप्राचार्या सौ सुचारिता ठाकरे व श्रीमती साळुंखे आर जे, पर्यवेक्षिका सौ शेवाळे पी एस, श्रीमती ठाकरे एल जे, सर्व प्राध्यापक व शिक्षक बंधुभगिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थिनींनचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने