देवळा तालुक्यातील मेशी या गावी बस सेवा अनेक दिवसांपासून बंद होते .ती त्वरित सुरू करण्यासंदर्भात अनेक वेळा मागणी देखील करण्यात आली होती .बस सेवा काही प्रमाणात सुरू झाली. परंतु काही बसेस सरळ मार्गे निघून जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी व वयोवृद्ध प्रवाशांना चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. गावातील नागरिकांना कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी नेहमीच जावे लागते बस सेवा पूर्णपणे सुरू न झाल्याने नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. यासंदर्भात छावा संघटनेचे, प्रवक्ता विष्णू जाधव , यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी यांच्यातर्फे आग्रा व्यवस्थापक , यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर , विष्णू जाधव,माधव शिरसाठ, राजू शिरसाट, तुषार शिरसाट ,विशाल मराठे ,राकेश आहेर हरी चव्हाण,यांच्या स्वाक्षर्या आहेत
कळवण मालेगाव मार्गे जाणाऱ्या बसेस मेशी मार्ग वळविण्यात याव्यात यासंदर्भात छावा संघटनेचे प्रवक्ता विष्णू जाधव यांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन
0