मालेगाव (जय योगेश पगारे) येथील नवीन बसस्थानकावर आज चुकून एका बसमध्ये महिला कविता बाबाजी आहिरे (नामपुर) मनमाड बस समजून बसल्या व घाईघाईत बसमधून उतरल्या आणि बॅग जशीच्या तशी बसमध्ये राहून गेली
नंतर त्या बसमध्ये आपली बॅग विसरल्याचे त्यांना समजले मग त्यांनी आरडा ओरडा करत माझी बॅग विसरली त्यात माझे पैसे व दागिने होते असा टाहो फोडला, त्याच वेळी तिथे उपस्थित असलेले एसटी प्रेमी अतुल लोढा यांनी संबंधित शिंदखेडा आगार प्रमुख यांना कॉल करून माहिती दिली त्यांनी त्वरित पुणे-शिंदखेडा चे चालक-वाहक यांना कॉल करून कळविले सदर बस फारान हॉस्पिटल जवळ बस थांबवून ती बॅग नवीन बसस्थानकावर लांबवली आणि त्या महिलेस बॅग व पैसे व दागिने सुपूर्द केले
त्यावेळी आयशानगर पोलिस स्टेशनचे पो.ना. देवकर, पो.शि. महाले, होमगार्ड तिसगे, वाहतूक नियंत्रक पी.एस. पवार, एस. एस. सोनवणे, प्रवाशी कार्यकर्ते शरीफ भाई यांनी सदर महिलांकडे सर्व वस्तू सुपूर्द केले