📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दोन किलो साखरचे वाटप होणार: धान्य वितरण अधिकारी दतात्रय शेजवून

 मालेगाव धान्य वितरण कार्यक्षेत्रासाठी फेब्रुवारी व मार्च 2022 करिता शंभर टक्के साखरेचे नियतन प्राप्त झाले आहे. त्यानुसार अंत्योदय योजनेंतर्गत लाभर्थ्यांना प्रति शिधापत्रिका दोन किलो साखरचे वाटप होणार असल्याची माहिती धान्य वितरण अधिकारी दतात्रय शेजवून यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार अंत्योदय योजनेंतर्गत माहे फेब्रुवारी 2022 करिता लाभार्थ्यांसाठी नियमित साखर शंभर टक्के प्रमाणे 136.72 क्विंटल व मार्च2022 करिता 136.01 क्विंटल असे एकूण 272. 73 क्विंटल साखर वाटपासाठी प्राप्त झालेली आहे. शासनाच्या नियतनाप्रमाणे अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशान्वये प्रती शिधापत्रिका दोन किलो साखर याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत कोणीही जनतेची दिशाभुल करुन अफवा पसरवू नये, असे आवाहन धान्य वितरण अधिकारी दतात्रय शेजवून यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने