📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मेशी विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध

 देवळा: ज्ञानेश्वर आढाव
          
         देवळा तालुक्यातील मेशी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध झाली.
      काल दि. ३०/३/२०२२ माघारीच्या दिवशी १३ जागेसाठी १३च उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अरूण र पाटील यांनी आज केली.
   निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मेशी येथील सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. विशेष करून मेशी ग्रामपंचायतीचे     माजी सरपंच केदा शिरसाठ, शिवसेना उपतालुकाप्रमुख बापुसाहेब जाधव,ग्रामपंचायत सदस्य शाहु शिरसाठ,राजु शिरसाठ , उखा नाना बच्छाव , भिका बोरसे , राहुल शिरसाठ , ग्रामपंचायत सदस्य शरद सुर्यवंशी यांनी प्रयत्न केले.
       बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे-
१)केदा तुळशीराम शिरसाठ
२) राजेंद्र दत्तु शिरसाठ
३)भिला शंकर आहेर
४) पंडित भिका शिरसाठ
५) सुधाकर बाबुराव बोरसे
६) बाबुलाल रघुनाथ चव्हाण
७) मोतीराम शिवाजी शिरसाठ
८) धनंजय नथु शिरसाठ
९) शंकर भिका पगार
 १०) वत्सलाबाई अभिमन बोरसे
११) चंद्रभागाबाई शिवाजी जाधव
१२) रतन शिवाजी अहिरे
१३) संजय तुळशीराम शिरसाठ
      या सर्व विजयी उमेदवारांचे भाजपा जिल्हाध्यक्ष मा.केदा नाना आहेर व मेशी येथील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने