📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

थकित मालमत्ता करवसुलीसाठी मालेगाव महानगरपालिकेची कठोर पावले; चार वसुली पथके नियुक्त, दंडासह जप्तीची कारवाई

मालेगाव शहरात मोठया प्रमाणात थकबाकीदार आहेत त्यांच्याकडील थकित मालमत्ता करवसुलीसाठी मालेगाव महानगरपालिकेने कठोर पावले उचललेली आहेत मार्च महिन्या अखेर थकबाकीचे उद्यिष्ट पुर्ण करणेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रभागनिहाय ०४ वसुली पथके नियुक्त करण्यात आले असुन यामध्ये मनपा अधिकारी व कर्मचारी अशा ४६ कर्मचारी यांचा समावेश आहे. महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी मागील काही दिवसापूर्वी थकबाकी वसुली बाबत आढावा बैठक घेवून अधिका-यांना व्यापक स्परूपात मोहिम राबविण्याचे तसेच प्रभाग अधिकारी यांना मोठया प्रमाणात असलेल्या थकबाकीदार यांची यादी तयार करून यासाठी नियुक्त करण्यात आलेले जप्ती पथकांची मदत घेवून थकबाकी वसुली करणेकामी कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
         त्या अनुषंगाने घरपटृी थकबाकी अधिक दंडासहित वसुली करणेकामी आयुक्त भालचंद्र गोसावी, उपायुक्त राजू खैरनार, सहा.आयुक्त (कर) हेमलता डगळे, सहा.आयुक्त (प्रशासन) सचिन महाले, सहा.आयुक्त तथा गृहकर अधिक्षक अनिल पारखे यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ३०/०३/२०२२ रोजी प्रभाग क्रमांक ०२ कार्यक्षेत्रातील द्याने भाग- ०४ या वसुली वार्डात प्रभाग अधिकारी शाम बुरकुल, जप्ती अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, जप्ती अधिकारी अमोल येवले, वार्ड लिपीक अनिल साताळे, वॉर्ड लिपीक फैयाज अहमद व इतर सहाय्यक शकील अहमद, राठोड आदीनी ०१) कैलास बाळु खैरनार थकबाकी २,३३,२५४/-  ०२) कैलास शिवाजी पगार १,०५,८७०/- या रकमेच्या थकबाकीपोटी कारखाने सिल करुन जप्तीची कारवाई केली.
तरी सर्व थकबाकीदार यांनी थकित कराची रक्कम भरून, जप्ती सारखा कटू प्रसंग टाळावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहान आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने