📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

The Kashmir Files चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना जिवे मारण्याच्या धमक्या; केंद्राने दिली 'वाय' श्रेणीची कमांडो सुरक्षा

विवेक अग्निहोत्री यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या चार-पाच सशस्त्र कमांडोना तैनात करण्यात येणार आहे.

जीवाला धोका असल्यामुळे केंद्राचा निर्णय.

मालेगाव (जय योगेश पगारे ) सध्या देशात बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालणारा सत्य घटनेवर आधारित मधील  'द काश्मिर फाईल्स'  चित्रपट चर्चेत आहे.
 कश्मिरमधील पंडिताचे पलायन व हिंसाचार यावर आधारित आहे. केंद्र सरकारने आता या चित्रपटाचे  निर्माते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना 'वाय' श्रेणीची सुरक्षा दिली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी चार ते पाच सशस्त्र कमांडोना तैनात करण्यात येणार आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी दावा केला आहे की त्यांना त्यांच्या ट्विटर अकाउंट वर अश्लिल मेसेजेस, जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, आजही फोनवर त्या धमक्या सुरू असल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रातर्फे त्यांना "वाय" दर्जाची 'सी आर पी एफ कमांडो' ची सुरक्षा केंद्रातर्फे देण्यात आली आहे

विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत हे जवान नेहमी सोबत असणार आहेत. 'द काश्मिर फाईल्स'  या चित्रपटावर अनेकांकडून टीका होतं आहेत.तर काहीजण या चित्रपटाची बाजू घेत आहेत. त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांना सुरक्षा देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने