📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

तहसिलदारांकडून होतेय अडवणूक; मालेगावच्या स्वस्त धान्य दुकानदाराचा गंभीर आरोप, निर्णय न झाल्यास सामुहिक आत्महत्येचा इशारा.

 मालेगाव (जय योगेश पगारे) तालुक्यातील कळवाडी येथील शेतकरी सहकारी संघाने स्वस्त धान्य विक्रीसाठी सेल्समनपदी नियुक्ती केली असतांनाही तहसिलदारांकडून अनेक प्रकारच्या चौकशी व  अहवालाच्या फेरात अडकून अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप कल्पना वाघ व सचिन वाघ यांनी कुटुंबांसह पत्रकार परिषद घेऊन केला.

यावेळी सचिन वाघ यांनी तहसीलदारांवर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करीत तहसिलदार हीन वागणूक देत असल्याचे सांगतांना त्यांना अश्रूही अनावर झाले, 

कळवाडी येथे शासनमान्य स्वस्त धान्य वितरणाचे दोन परवाने असून त्यापैकी एक परवानाधारक मालेगाव येथील शेतकी संघाने गेल्या ऑगस्ट महिन्यात स्थानिक महिला कल्पना वाघ यांची विक्रेता म्हणून नियुक्ती केली. त्यानुसार शेतकी संघ आणि वाघ यांनी तहसील कार्यालयास कळविले. मात्र दुकान जोडणीचे आदेश हे पाच महिने उशिराने देण्यात आले. त्यातही ११ जानेवारीला हा आदेश काढतांना महसूल खात्याने केवळ २० टक्केच धान्य उचलण्याची हेतुपुरस्कर अडवणूक केल्याची वाघ यांची तक्रार आहे.

दरम्यान दुकान जोडणीचे आदेश देतानाच पुरवठा विभागाने धान्य वाटप करण्यासाठी आवश्यक असलेले ई-पॉस यंत्र देणे आवश्यक होते. मात्र ते तेव्हा दिले गेले नाही. त्यामुळे चलनाने रीतसर रक्कम भरून धान्यसाठा उचलल्यावरही
शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यात बाधा निर्माण झाली. यासंबंधी वारंवार विनवणी केल्यावर ११ फेब्रुवारी रोजी हे यंत्र पुरविण्यात आले तरी ते आभासी सुरू करण्यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. त्यानुसार धान्य वाटप सुरू असताना दुसऱ्याच दिवशी १७ फेब्रुवारी रोजी परवाना रद्द झाल्याचा निरोप आपल्याला भ्रमणध्वनीवरून कळविण्यात आला, अशी तक्रार वाघ यांनी केली आहे

या प्रकारामुळे मानसिक व सामाजिक स्वास्थ खराब झाले असून,  निर्णय न झाल्यास सामूहिक आत्महत्या करू असा इशाराही वाघ  माता पुत्राने दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने