(मालेगाव लाईव्ह न्युज नेटवर्क)
मालेगाव तालुक्यातील हरणशिकार जिल्हा परिषद शाळेला गाळणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्य केशरबाई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स्वप्नील रायते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज वाघ, समाधान पवार, उमेशसिंग परदेशी,संभाजी जगताप, मंगलदास पवार, पंडित बच्छाव, दादा कदम मुख्याध्यापक प्रकाश परदेशी उपस्थित होते. शाळा भेटीत शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतूक करण्यात आले. भेळ पार्टी उपक्रमाबाबतही समाधान व्यक्त केले. शाळेला सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले. इमारत दुरुस्तीचे ५० टक्के थकित अनुदान शासनस्तरावरून मिळावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.