📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या फ्रंटलाईन आरोग्य कर्मचा-यांचा महापालिकेतर्फे सत्कार

मालेगाव (मालेगाव लाईव्ह ब्युरो) भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्ताने केंद्रशासनाच्या आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या धर्तीवर म.शासनाच्या निर्देशान्वये राज्यातही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. 
दि.१६ मार्च २०२२ रोजी आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत दि. २७ फेब्रुवारी,२०२२ रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमातील फ्रंटलाईन आरोग्य कर्मचा-यांचा सत्काराचा कार्यक्रम प्रभाग स्तरावर राष्ट्रीय लसीकरण दिवसा साजरा करणे कामीचे शासनाचे पत्र प्राप्त झाले असलेने त्या अनुषंगाने आयुक्त भालचंद्र गोसावी यांचे अधिपत्याखाली व उपायुक्त राजू खैरनार, सहा.आयुक्त हेमलता डगळे, आरोग्याधिकारी डॉ.सपना ठाकरे याचे मार्गदर्शनाने आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे नियोजन सर्व प्रभाग अधिकारी व आरोग्यधिकारी, नगरसचिव, जनसंपर्क अधिकारी यांचे समन्वयातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
           दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मध्ये उल्लेखनीय व सर्वात्कृष्ट काम केलेल्या फ्रंटलाईन आरोग्य कर्मचा-यांचा सत्काराचा कार्यक्रम चार प्रभाग समिती कार्यालयामार्फत आरोग्य विभागाकडून राबविण्यात आला. यामध्ये मालेगाव महानगरपालिका संचलित नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व ए.एन.एम. कर्मचारी यांचेतून निवड केलेल्या २ आशा स्वयंसेविका व १ ए.एन.एम. अशा एकुण १२ कर्मचारी यांचा प्रभाग क्रं. ०१ मध्ये १) बालिका मते (ए.एन.एम), सोयगाव नागरी आरोग्य केंद्र, २) मीना निकम (आशा स्वयंसेविका) सोयगाव नागरी आरोग्य केंद्र ३) संगीता खैरनार (आशा स्वयंसेविका) कॅम्प नागरी आरोग्य केंद्र प्रभाग क्रं. ०२ मध्ये १) मंगला मधुकर आव्हाड (ए.एन.एम), आयेशा नगर आरोग्य केंद्र २) महैरुन्नीसा शाकीर हुसैन (आशा स्वयंसेविका) रमजानपूरा आरोग्य केंद्र ३) सोनाली दौलत गरूड (आशा स्वयंसेविका) निमा २ आरोग्य केंद्र प्रभाग क्रं. ०३ मध्ये १) प्रमिला सुर्यवंशी (जी.एन.एम), २) शाहिदा जमील अहमद (आशा स्वयंसेविका) निमा १ आरोग्य केंद्र ३) सोनाली शेवाळे (आशा स्वयंसेविका) गोल्डन नगर आरोग्य केंद्र यांचा तसेच प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ४ चे १) मनिषा निकम, ए.एन.एम., गुरुवार वॉर्ड ना.आ.केंद्र २) आरिफा बानो शेख वसिम, आशा स्वयंसेविका ३) शबबिना अकिल अहमद आशा स्वयंसेविका, आय.एम.ए.ना.आ.केंद्र यांना मनपाचे उपायुक्त, पदाधिकारी व मनपा सदस्य, वैद्यकीय अधिकारी, प्रभाग अधिकारी व वरिष्ठ अधिकारी याचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रंसगी उपायुक्त राजू खैरनार, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.पुष्पा राजेश गंगावणे, प्रभाग सभापती अब्दुल अजिज अब्दुल सत्तार, मनपा उर्दु शाळा मुख्यध्यापिका श्रीमती फरहत मॅडम, मनपा सदस्य विठ्ठल बर्वे, नजिर अहमद इरशाद, अब्दुल बाकी मो. इस्माईल्, अन्सारी मो.साजिद अ.रशिद, सामाजिक कार्यकर्ते मो.रिजवान, राशिद अन्सारी, तसेच मनपाचे डॉ.निमा सुर्यवंशी, डॉ.सुनिता रोकडे, डॉ. ज्योत्सना नानावटी, डॉ.लुबना, डॉ.जयश्री पवार, डॉ.फॅहमीदा अन्सारी, डॉ.शगुफ्ता शादाब, डॉ.शबीना,डॉ.आमरा,डॉ. प्रभाग अधिकारी सर्वश्री जगदिश बडगुजर, श्याम बुरकूल, हरिश डिंबर,कदीर अह.अ.लतीफ तसेच जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे व आदी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने