📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

के.बी.एच. विद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान व व्याख्यानाचे आयोजन


       के.बी.एच.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगांव कॅम्प येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा (शिक्षिकांचा) सन्मान व सामाजिक  कार्यकर्त्या मा. सुनिता कुलकर्णी यांचे व्याख्यानाचे आयोजन करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
    महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांत दादासाहेब हिरे,माजी शिक्षक आमदार समन्वयक डॉ. अपूर्व भाऊ  हिरे , विश्वस्त डॉ. अद्वय आबासाहेब हिरे, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा संपदा  दिदी हिरे, सहसचिव डॉ. व्ही.एस. मोरे मामासाहेब, संचालक अनिल पवार यांनी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य आबासाहेब प्रवीण पाटील होते.यावेळी  प्रमुख अतिथी तथा  व्याख्यात्या मा. सुनीता कुलकर्णी, मंगला मिश्रा, पर्यवेक्षक नितीन गवळी, संजीव महाले, संजय शिंदे,जेष्ठ प्राध्यापिका सौ.शितल शिंदे,विशाखा समितीच्या अध्यक्षा प्रा.श्वेता पाटील ,प्रा.स्मिता खैरनार, प्रा. आरती देवरे, प्रा. शितल देसले, प्रा. पद्मावती घिवारे, सौ आशा पगार ,श्रीमती एस. एम. निकम, प्रा. सीमा कदम व्यासपीठावर विराजमान होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
         प्रास्ताविक व व्याख्याते यांचा परिचय प्रा.श्वेता पाटील यांनी केला. व्याख्यात्या सामाजिक  कार्यकर्त्या मा.सुनिता कुलकर्णी यांनी  महिलांचे विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल बोलतांना आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून आपल्या कर्तुत्वाने त्यांनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे हे सांगून  असंघटित कामगारांसाठी उभारलेल्या कामासंदर्भात मार्गदर्शन करून उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
       जागतिक महिला दिन निमित्ताने विद्यालयाच्या वतीने सर्व महिलांचा (शिक्षिकांचा) सन्मान करण्यात आला.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रवीण पाटील (आबासाहेब )यांनी जागतिक महिला दिन महिलांना सन्मान देण्यासाठी महिला सशक्तीकरण आणि मुला मुलींमधील भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.आज प्रत्येक क्षेत्रात  महिलांनी  मिळवलेल्या यशाचा अतुलनीय आढावा घेत महिलांचे योगदान कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन करून जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
      सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेश धनवट  यांनी केले.आभार प्राध्यापिका स्मिता खैरनार यांनी मानले.कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे राजेंद्र शेवाळे, सुनील सूर्यवंशी, जयदीप शेवाळे,जे.टी. ठाकरे  यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक  ,शिक्षक बंधू भगिनी  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने