📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सूरज मांढरे यांची राज्याचे शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती

नवे जिल्हाधिकारी गंगाधरण डी
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची बदली झाली असून गंगाधरण देवराजन हे आता नाशिकचे नवे जिल्हधिकारी असणार आहेत. ते मंत्रालयात मुख्य सचिवांचे उपसचिव म्हणून कार्यरत होते. मांढरे यांची राज्याच्या शिक्षण आयुक्त पदी नियुक्ति झाली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तीन वर्ष सेवा कालावधी पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांच्या तात्काळ बदल्या करा, असे आदेश निवडणुक आयोगाने राज्य शासनाला दिले होते. राज्यशासनाने काल नऊ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. आदेशानुसार डॉ. संजय चहांदे, ए.एम. लिमये, एसए तागडे, आभा शुक्ला, डॉ अमित सैनी, आरएस जगताप, विवेक भीमानवार, राहुल द्विवेदी आणि गंगाधरन देवराजन या नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी मांढरे यांच्या जागी नाशिक जिल्हाधिकारी पदी गंगाधरण डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने