📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव महानगरपालिकेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

   आज दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त मालेगाव महानगरपालिका, मालेगाव व डॉ.हिमांशु जैन, महालॅब यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव महानगरपालिकेतील सर्व महिला सदस्य, महिला अधिकारी, व महिला कर्मचारी यांचे करिता मनपाच्या जुन्या सभागृहात “दंत चिकित्सा तपासणी”, रक्त तपासणी, क्षयरोग (टिबी) तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचा शुभारंग मा. आयुक्त भालचंद्र गोसावी व महिला व बालकल्याण सभापती सौ.पुष्पा राजेश गंगावणे यांचे हस्ते उपायुक्त राजू खैरनार, सहा.आयुक्त हेमलता डगळे, सहा.आयुक्त सचिन महाले, आरोग्याधिकारी डॉ.सपना ठाकरे यांचे उपस्थितीत पार पडला. मा. आयुक्त महोदय यांनी सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बेबीनंदा कासार व सांगता मधुर संसारे यांनी केली. यावेळे महिला बालकल्याण सभापती, पुष्पा गंगावणे, सहा.आयुक्त हेमलता डगळे, आरोग्याधिकारी डॉ.सपना ठाकरे व इतर महिला कर्मचारी यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. 
   तसेच मा.आयुक्त महोदय यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वात प्रथम सर्व महिला सदस्य, महिला अधिकारी व महिला कर्मचारी यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व मातृत्वाचा दिव्य पराक्रम करू शकणा-या अनादी कालापासून ते अनंत कालापर्यंत परमेश्वराची सर्वात्तम निर्मित्ती असलेल्या स्त्री रूपातील समस्त जगत्र जननीस जागतिक महिला दिनामित्त त्रिवार अभिवादन केले. तसेच कोव्हीड काळात सर्व महिला कर्मचारी भगीनीनी पुरूष सहकारी यांचे समवेत खांद्याला खांदा लावून आपातकालीन परिस्थित अतिशय उल्लेखनीय कार्य केले असल्याचे सांगीतले.
   सदर कार्यक्रमाप्रसंगी डॉ.अमोल दुसाने, डॉ.अलका भावसार, जयश्री देशमुख, रुथ शिंदे, सपना शेख, कांताबाई सोनवणे, मिना बोरसे, कल्पना सोनपसारे, बेबीनंदा कासार, मधुर संसारे, हिरकणी वाभळे, सुफीया इस्हाक, रोहिणी पाटील, सोनी गवळी, मिस्बा शेख, नुतन मोरे, महिमा शुक्ला, सविता आहिरे, छाया पाटील, रत्ना जाधव, सुंनदा आहेर, मंगल खैरनार, निकीता देशमुख, मंगल हिरे, रेखा जगताप, मयुरी सोनवणे, आम्रपाली साबळे, पल्लवी गायकवाड, ज्योती जाधव, आदी महिला कर्मचारी उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने