राकेश आहेर | चांदवड देवळा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत देवळा तहसील कार्यालय येथे "हिरकणी कक्षाची" स्थापना करण्यात आली.
सदर कक्षाचे उदघाटन कोविड मध्ये पती मयत झालेल्या विधवा झालेल्या महिलेच्या हस्ते करण्यात आले आहे. सदर कक्ष हा तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्या स्तनदा माता, लहान मुले- महिला यांच्या आरामासाठी, बसण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सदर कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, देवळ्याचे तहसिलदार विजय सुर्यवंशी, देवळा तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, महिला व बाल विकास अधिकारी जयश्री नाईक, निवडणूक, नायब तहसिलदार विजय बनसोडे व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.