मालेगाव (मालेगाव लाईव्ह ब्यूरो) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालय जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील इंग्रजी आणि उर्दू विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त श्री राजू खैरनार , सिटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घुसर, उपनिरीक्षक श्री शैलेश पाटील आणि प्रभाग अधिकारी श्री डिंबर यांनी महाविद्यालयास भेट दिली आणि सर्व महिला प्राध्यापिकांना आणि विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आपल्या व्याख्यानात श्री. राजू खैरनार यांनी महिलांनी आत्मनिर्भर बनावे धैर्यवान बनावे असे आवाहन केले. श्री घुसर यांनी उपस्थित विद्यार्थिनींना योग्य जीवन शैली आचरणात आणावी असे आवाहन को केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान यांनी स्त्री शक्तीचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी प्रत्येक दिवस हा स्त्रीचाच असतो हे स्पष्ट केले. इंग्रजी विभागातर्फे महिलांच्या आरोग्य विषयक समस्या आणि उपाय या विषयावर सौ आशा आहिरे स्थानिक प्रबंधक कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी त्यांच्या समस्या सांगून त्यांचे निराकरण करून घेतले. उर्दू विभागातर्फे अल खिदमात या सेवाभावी संस्थेच्या अल्कामा कौसर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. फहमीदा अन्सारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. फर्जाना, डॉ लोधी कनीझ फातिमा यांच्यासह कु.नौशाबा कु. मनताशा इत्यादी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.