📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अनाथांचे नाथ! कोरोनामुळे पालक गमावलेल्या पाल्यांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना शासनाचा विशेष पुरस्कार

नाशिक (प्रमोद पवार) 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत या कालावधीत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री महिला बाल विकास मंत्री व महिला व बालविकास राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना कोविड काळातील विशेष योगदानाबद्दल 'विशेष पुरस्काराने' गौरविण्यात आले

कोरानाने जगात हाहाकार माजविला होता, सर्वांचे अतोनात नुकसान झाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले, अनेक लहान मुलांनी त्यांचे पालक गमावले, प्रचंड आर्थिक, सामाजिक, मानसिक नुकसान लोकांनी सोसले.
यामध्ये सर्वाधिक नुकसान लहान लेकरांचे झाले ज्यांनी आपले दोघे पालक गमावले
नाशिक जिल्ह्यात जवळपास 40 कुटुंबातील 58 बालके आहेत ज्यांचे माता-पित्याचे छत्र कोरोनाने हिरावून नेले, काही बालकांच्या नातेवाईकांना त्यांचा हा अतिरिक्त भार उचलणे कठीण जात होते, याशिवाय या बालकांच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, त्यातल्या त्यात त्यांच्या पालकांच्या मिळकतीवर त्यांचे नाव लागणे बँक खात्यांमधील शिल्लक बालकांच्या नावे होणे, तसेच पालकांवर कर्ज असल्यास कर्ज वसुली तूर्त थांबविणे या साऱ्या गोष्टींचा विचार करून या बालकांच्या भवितव्यासाठी त्यांना आश्रय देणारे कुटुंबे बळकट केली पाहिजे एनजीओ कडून मिळणारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे या निर्मळ भावनेतून जिल्हाधिकारी कार्यालयातील चाळीस अधिकाऱ्यांनी त्यांचे पालक होण्याचे ठरवले व त्यानुसार शासकीय मदत दुत फ्री मोहीम सुरू केली, 
यामध्ये प्रत्येक जण इतका भावनिक झाला होता की ज्यांना ही जबाबदारी मिळाली नाही त्यांनी याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करीत आम्हालाही या सत्कार्याचा भाग होऊद्या अशी विनंती केली.
हे मिशन सुरू होतात प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडतात प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधत काय आवश्यक आहे त्या गोष्टींची पूर्तता केली, काळजीवाहू कुटुंबे सक्षम करण्यासाठी चाळीसहून अधिक योजनांची पुस्तिका तयार केली. 
या बालकांना अनेक स्वयंसेवी संस्थांनी आणि व्यक्तींनी यातून प्रेरणा घेऊन मोफत शिक्षण वैद्यकीय उपचार इत्यादी देऊ केले आहेत.

या उत्कृष्ठ आणि माणुसकी जपणाऱ्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक महिला व बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना या विशेष पुरस्काराने आज मुंबई येथे गौरविण्यात आले
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने