📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अठ्ठावीस वर्षांनंतर रंगली शेवटच्या बाकावरची चर्चा; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा, वडेल येथील के.बी.एच विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

अठ्ठावीस वर्षांनंतर रंगली शेवटच्या बाकावरची चर्चा... जुन्या आठवणींना मिळाला उजाळा...
वडेल येथील के.बी.एच विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

महेंद्र पगार |  कुकाणे 
        
  जुन्या आठवणीना उजाळा देत भावविभोर झालेले मन, शालेय जीवनात शाळेने दिलेले संस्काराची शिदोरी व गुरूजणांप्रती जपुन ठेवलेली आदरयुक्त आस्था अशा वातावरणात अठ्ठावीस वर्षांनंतर दहावी च्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. गेल्या अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मिञ मैञिणींना भेटुन सर्वजनच अक्षरशः भारावून गेले होते. वडेल येथील के.बी.एच विद्यालयाच्या १९९४ च्या बॅचचे विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन वडेल येथील शाळेतील सभागृहात झाले.सरस्वती पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरे सर होते. 

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती ।
दोन दिसांची रंगत संगत,दोन दिसांची नाती ।।

अशा शब्दात उपस्थित विद्यार्थ्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.
विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर बालपणी स्नेहाच्या भेटीचा आनंद स्पष्ट दिसत होता. भेटिला भावनेची किनार होती. सुमारे ११५ विदयार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.सर्वान्नी एकमेकांच्या नोकरी व्यवसाय कुटुंबाविषयी जाणुन घेतले. पुन्हा आपण निरागस तनावविरहित जिवण जगायला मिळावे असे अनेकांना वाटत होते. बालपणीच्या मित्र मैत्रिणींना भेटण्याचा आनंद चेहर्याजवर स्पष्ट दिसत होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान शेलार यांनी केले. व्यासपिठावर मोरे सर, डी.पी.पवार सर , जाधव शिक्षक उपस्थित होते. आपले विद्यार्थी विवीध ठिकाणी वेगवेगळया पदांवर कार्यरत असल्याने शिक्षकांनी आपल्या मनोगतात कौतुक केले.

   प्रारंगी राष्ट्रगीत झाल्यावर ज्या प्रार्थनेने जगाचा धर्म कळाला ती साने गुरुजींची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रार्थना म्हणण्यात आली. दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या चिवचिवाट कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन पक्षी संवर्धन करणार असल्याचे सांगितले तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपण करणार असल्याचा निश्चय करण्यात आला. यावेळी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. संगीत खुर्ची खेळ्यात अठ्ठावीस वर्षांनंतर विद्यार्थि एकमेकांच्या मागे धावले, दमले, व जिंकलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देखिल देण्यात आली. थट्टा, गप्पा, मस्करीला उधाण आले. धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचे ठरविले.

    मंगलदास शेलार, सोमनाथ अहिरे, सुरेश सावळे. स्मिता शेलार, मनीषा बागडे , निलेश यांसह आदिंनी शालेय जिवणातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

वडेल येथील व्यावसायिक सोमनाथ अहिरे, समाधान शेलार यांनी जून्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधून स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी शांतीलाल सोनजे , संजय पंचरस, पुष्पलता शेलार , मनीषा बागडे, नीलेश शेलार, दत्ता भांबरे, निलेश वरखडे, वैशाली सोनवणे, ललिता अहिरे, कल्पना काकुळते. इंदिरा शिरोळे, आशा बोरसे, कुसुम बोरसे, योगिता अहिरे, संदीप आहिरे, सुधाकर भामरे, बाळू सोनवणे, चंदू चौधरी, पवन शिरोळे, अरुण बोरसे
ज्ञानेश्वर उशिरे, आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन समाधान शेलार यांनी केले. आभार शांतीलाल सोनजे यांनी मांडले.

प्रतिक्रिया:
     धकाधकीच्या आयुष्यात आपले जवळचे मित्र नाते, संबंधातील, व्यक्ती याच्याशी ऋणानुबंध जपणे आवश्यक झाले आहे. यामुळे सर्व वर्गमित्र एकत्र यावेत सुखदुःखाच्या चर्चा व्हावी, यासाठी नियोजन केले, सर्व मित्रांनी प्रतिसाद देत उपस्थित राहिले. व आनंद साजरा झाला.
-सोमनाथ अहिरे , माजी विद्यार्थी
के.बी.एस विद्यालय, वडेल 

अठ्ठावीस वर्षानंतर शाळेचे दिवस आठवले. सर्व जुने मैत्री एकत्र आल्या त्यामुळे खूप आनंद झाला 
- मनीषा बागडे, माजी विद्यार्थिनी 
के.बी.एस विद्यालय, वडेल 



छायाचित्र: वडेल येथील के.बी.एच.विद्यालयाच्या १९९४ च्या बॅचचे स्नेहसंमेलन प्रसंगी जमलेले माजी विद्यार्थी, शिक्षक

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने