मालेगाव (जय योगेश पगारे) काही तातडीच्या कामानिमित्त उद्या दि 27 मार्च रोजी सोयगाव उपकेंद्राचे (Soygaon sub station) अंतर्गत येणाऱ्या मालेगाव शहर व परिसरात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडणे सहाजिक आहे.
आधीच उष्णतेची लाट व उकाड्याने जनता हैराण आहे, परंतु न टाळता येणाऱ्या या कामासाठी विद्युत पुरवठा दिवसभर खंडित करण्यात येणार आहे, त्यामुळे आपली विद्युत उपकरणे, जसे की इन्व्हर्टर, मोबाईल आदी चार्ज करून ठेवणे आवश्यक आहे ज्यामुळे आपली गैरसोय होणार नाही.
वास्तविक एवढा वेळ वीज पुरवठा खंडित होणे ही बऱ्याच दिवसांपासून न अनुभवलेली गोष्ट असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होणे सहाजिक आहे.
वृद्ध, तसेच लहान मुलांचे उकाड्यामुळे हाल होऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी त्यांच्यासाठी तशी समांतर व्यवस्था करून घेणे फायद्याचे ठरेल.