📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आई व बहिणींचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी चाळीस हजार रूपये लाचेची मागणी; लाच स्वीकारताना नामपुर दुरक्षेत्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत च्या ताब्यात

नामपुर ( दिनेश सोमवंशी) नामपुर दुरक्षेत्राच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास दहा हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार लाचलुचपत विभागाच्या युनिट तर्फे सापळा रचून कारवाई करत रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार यांचे आई-वडील व दोन्ही बहीण अशा पाच जणांविरुद्ध  गुन्हा दाखल असून त्यात तक्रारदार यांची आई व दोन्ही बहिणी यांची नावे गुन्ह्यातून कमी करणेसाठी आरोपी जगन्नाथ लाला महाजन, वय 57 वर्ष, व्यवसाय-नोकरी, नेम.जायखेडा पोलीस स्टेशन, नामपूर दुरक्षेत्र, ता. सटाणा, जि. नाशिक याने 40,600/- रुपयांची लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता 10000/- रु. पंच साक्षीदारांसमोर स्वीकारला आरोपीस नामपूर दूरक्षेत्र, ता.सटाणा येथून ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


⏩ पडताळणी:- दि.26.03.2022
⏩ सापळा कारवाई:- दि.26.03.2022
⏩ लाचेची मागणी:- 40,600/- रुपये.
⏩ लाच स्वीकारली:-* 10,000/- रूपये.

या कारवाईसाठी, सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक. 
 नारायण न्याहाळदे , अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परीक्षेत्र, नाशिक.
सतिश भामरे  पोलीस उपअधीक्षक (वाचक) ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक. आदींचे मार्गदर्शन लाभले

सापळा पर्यवेक्षण अधिकारी:-
▪️राकेश आ. चौधरी, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार.
सापळा अधिकारी 
▪️पोलीस निरीक्षक, समाधान म. वाघ, ला.प्र.वि., नंदुरबार
पोह/उत्तम महाजन, पोहवा/विजय ठाकरे, पोना/ देवराम गावित व पोना/मनोज अहिरे सर्व नेम. ला.प्र.वि., नंदुरबार. यांच्या पथकाने ही कारवाई केली

 याद्वारे सर्व  नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रबंधन विभागातर्फे करण्यात येत आहे

☎️ नंदुरबार एसीबी कार्यालय फोन नं.:- 02564-230009*
📞 *Toll free No.:-1064*
📧 *Email:-* dyspacbnandurbar@maharashtra.gov.in

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने