📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सौंदाणे जवळ दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर

सौंदाणे (ज्ञानेश्वर आढाव) सौंदाणे गावाजवळ आज वेगवेगळे दोन अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
आज सकाळी पहाटेच्या सुमारास लक्झरी बसने कार क्रमांक MH 22 D4444 या कारला कट मारला, यावरून दोघांची रस्त्यावरच बाचाबाची सुरू होती परंतु अचानक मागून द्राक्षाची वाहतूक करणाऱ्या भरधाव आयशर ने कारला जोरदार धडक दिली व जवळपास शंभर फूट पुढे फरफटत नेले, यामध्ये कार मधील मागच्या सीटवर बसलेले एक व्यक्ती जागीच ठार झाली असून पुढच्या सीटवर दोन व्यक्ती गंभीर जखमी झालेले आहेत हे सर्व जळगावचे रहिवासी असल्याचे समजले, 
दुसऱ्या एका अपघातात ट्रकने पिकअपला MH 15 CK 6771 जोरदार धडक दिली, पिकअप मध्ये गाईंची वाहतूक करण्यात येत होती या अपघातात पिकअप चा चक्काचूर झाला असून, अनेक गाई जखमी झाल्या आहेत, गाईंना नागरिक तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मुंगसे येथील गोशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती समजते, 
सदर अपघातांचा पंचनामा सुरू असून सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध केले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने