मालेगाव (राजेश धनवट)
के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पुष्पा वाघ ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापुर्ती सोहळा प्राचार्य प्रविण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे संचालक माजी प्राचार्य अनिल पवार (तात्यासाहेब)उपस्थित होते .यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य डी.यु. पाटील, माजी प्राचार्य बी.वाय. पाटील, ज्येष्ठ प्राध्यापिका शीतल शिंदे, माजी प्राचार्या मंगला हिरे, प्राचार्य प्रमिला पाटील, प्राचार्या नुरजहा शेख, प्राध्यापक के.एन.आहिरे, उपप्राचार्य राजेंद्र पाटील, प्रशांत वसईकर, तन्मय बांदिवडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे, लोकनेते व्यंकटराव हिरे, माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करून सेवापुर्ती सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. सर्वप्रथम कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या समाधीचे व पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सत्कारमूर्ती श्रीमती पुष्पा वाघ यांना विद्यालयाच्या वतीने चांदीची गणेशाची मूर्ती ,सन्मानपत्र, साडी, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य डी.यू. पाटील, प्रा. के.एन.आहिरे, माजी प्राचार्य मंगला हिरे, नीरज देवरे ,प्रशांत वसईकर, नंदनी वसईकर ,रूपा मोरे, योगिनी बांदिवडेकर, मिलिंद मोरे ,नेहा वाघ ,भूषण वाघ यांनी मनोगतातून मॅडमच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
प्रमुख अतिथी माजी प्राचार्य तात्यासाहेब अनिल पवार यांनी श्रीमती पुष्पा वाघ यांनी कर्तव्यनिष्ठपणे आणि जबाबदारी पूर्वक एकाच विद्यालयात ३८ वर्ष शिक्षिका पदावर काम करताना विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नेहमीच विद्यार्थी हिताचाच विचार केला . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली. श्रीमती पुष्पा वाघ अत्यंत मनमिळावू, संयमितपणा, बौद्धिकचमक दिमाखदार व आकर्षक व्यक्तिमत्व यामुळे त्याची वेगळीच छाप विद्यार्थ्यांवर पडत असे. कर्तुत्ववान माणसाचे मोठेपण त्यांच्या गुणांनी आणि कर्माने मोजायचे असते असे गौरवोद्गार काढले.
सत्कारमूर्ती श्रीमती पुष्पा वाघ यांनी ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतील आठवणींना उजाळा देत संस्थेविषयी व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रवीण पाटील (आबासाहेब)यांनी वाघ ३८ वर्षाच्या प्रामाणिक कामाचे कौतुक करून विद्यालयाची गानकोकिळा म्हणून आपली ओळख जनमाणसात निर्माण करणाऱ्या मॅडमचे सेवानिवृत्ती नंतरचे आपले उर्वरित आयुष्य सुख-समृद्धी व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती चा परिचय व सन्मानपत्राचे वाचन राजेश धनवट यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार शशिकांत पवार यांनी मानले. कार्यक्रमास श्रीमती पुष्पा वाघ यांचे आप्तेष्ट, मैत्रिणी, संस्थेतील आजी-माजी प्राचार्य, शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी ,शिक्षकेतर बंधू उपस्थित होते. कार्यक्रमास पर्यवेक्षक नितीन गवळी, संजीव महाले, संजय शिंदे, कार्यालय प्रमुख संजय सूर्यवंशी,माजी प्राचार्य पी. आर. पाटील, माजी प्राचार्य वाय. आर. पवार, दिनेश पवार,ए.आर. ठोके, हेमंत देवरे, तसेच आजी-माजी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक बंधू-भगिनी तसेच हिरालाल देवतळे, चरण देवतळे, साहेबराव अहिरे, तुकाराम सोनवणे ,माणिक देवतळे, राजेश शिवणकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी मॅडमचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील सूर्यवंशी, हेमंत पगारे ,जयदीप शेवाळे तसेच शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर बंधूंचे सहकार्य लाभले.