📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

फलक रेखाटनातुन महिला भगिनींच्या कर्तुत्वाला सलाम

राकेश आहेर | चांदवड देवळा
 
    दिनांक ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला भगिनींच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता. चांदवड. जि. नाशिक. येथिल कलाशिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडुच्या माध्यमातून अनोखे फलक रेखाटन केले आहे.
 आज महिला शिक्षण, वैद्यकीय, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, संशोधन ,अशा सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवीत आहेत.  समाजात दृष्टीआड अशा काही कर्तुत्ववान महिला आहेत ज्या त्यांच्या कार्याने विपरीत परिस्थितीत जिद्द, हिम्मत, मेहनत  व चिकाटीच्या जोरावर येणाऱ्या अडचणी सोबत दोन हात करून भल्याभल्यांना लाजवतील.              
   अशाच या देशातील पहिल्या सुशिक्षित महिला ट्रक चालक भोपाळच्या योगिता रघुवंशी आहेत. कॉमर्स एल एल बी चे शिक्षण घेतलेली महिला पतीच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबातील दोन मुलांची जबाबदारी घेत १४ टायर ट्रक, ३० टन लोड करून देशाच्या कानाकोपऱ्यात दिवस-रात्र भ्रमण करणारी ही एक रणरागिनी.
 कुटुंबात सुख: दुःखाच्या रस्त्यावरून जाताना घराच्या ड्रायव्हिंग सीटवरून ते हायवेवरील ट्रकच्या ड्रायव्हिंग सीटवरील योगिता रघुवंशी यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. दोन मुलांना घरी ठेवून रात्रंदिवस देशभर ट्रक प्रवास म्हणजे स्टेरिंग वरील डेअरींगच ,,,,! 
कदाचित महिला सशक्तिकरणाची सुरुवात येथूनच होते. स्त्री म्हणजे आई , बहिण ,पत्नी, मैत्रीण, जन्माची सुरुवात. तिचा आदर व सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त रंगीत खडू माध्यमाच्या रेखाटनातून तिच्या धैर्याला व कर्तुत्वाला सलाम,,,,! व समस्त स्त्री शक्तीला मानाचा मुजरा.. !!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने