मालेगाव ( मनोहर शेवाळे ) खंडेराव भक्तांवर काळाचा घाला
मालेगाव तालुक्यातील गिगाव फाट्यावर भीषण अपघात
04 ठार; 15जखमी; 04 गंभीर
मालेगाव :- चंदनपुरी येथे खंडेराव महाराज यांच्या दर्शनासाठी रविवारी हजारो भाविक हजेरी लावतात. दर रविवारी येथे गोधळाचा कार्यक्रम असतात, दरम्यान गोधळासाठी चाळीसगाव तालुक्यात आलेल्या भाविकांच्या टेम्पो क्र.( MH 19 BM 0102) ला मालेगाव-चाळीसगाव रोडवरील गिगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 04 ठार तर 15 भाविक जखमी झाले आहेत. जखमी पैकी 04 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
सायंकाळी उशिरा हा अपघात झाला असून रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरू होते. अपघात इतका भीषण होता की रात्री उशिरापर्यंत मृतदेहांची ओळख पटलेली नव्हती. याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव तालुक्यातील गिगाव फाट्यावर चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बसविण्यात आले आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने हा अपघात झालेचे बोलले जात आहे. दरम्यान गिगाव फाट्यावर असलेल्या गतिरोधक मुळे टेम्पो पलटी झाला. टेम्पोने 3 ते 4 पलटी घेतल्याने त्यातील 04 भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आबाजी जालम पाटील 60, बन्सीलाल सदा पाटील 43, कालाबाई पोपट पाटील, कंतील पोपट पाटील याचा मृत्यू झाला असून अन्य 15 भाविक जखमी आहेत. जखमीपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.