📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नामपुर येथील खेतेश्वर मिठाई व राशी मेडिकल ला भीषण आग,आगित लाखोंच्या मालाची राख...



नामपुर  (आकाश साळुंके )दि.12 येथील बस स्थानक आवारातील खेतेश्वर मिठाई या दुकानाच्या मागील बाजूस इलेक्ट्रिक मीटर मधे शॉर्टसर्किट झाल्याने पहाटे 4 च्या सुमारास पेट घेतला ही आग एवढी प्रचंड गतीने वाढत गेली शेजारील राशी मेडिकल देखील आगित जळून खाक झाले.यामुळे लाखोंचे नुकसान झाले असे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे आग आटोकयात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले नंतर मालेगांव महानगर पालिका व सटाना नगर परिषद चे अग्निशामक दलाचे बंब
 घटनास्थळी 1 तास उशिरा पोहचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
त्यांनी उशिरा येण्याचे कारण स्पष्ट करत कुपखेड़ा ते नामपुर रस्ता अतिशय खराब असल्याने 1 तास उशीर लागला.
यावेळी घटनास्थळी जायखेड़ा पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी ,विद्युत विभागाचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले होते.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने