📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

संदेश सिनेमॅक्सला द कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित करावा; चित्रपटप्रेमींची व्यवस्थापनाकडे मागणी.


90 च्या दशकातील काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणारा द काश्मीर फाईल्स हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला,मात्र मालेगावात हा चित्रपट प्रदर्शित केला गेलेला नाही.
मालेगावातील  प्रेक्षकवर्ग हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहे,देशभरात प्रदर्शित झालेला हा चित्रपट मालेगावात प्रदर्शित का झाला नाही,याचे कारण काय? याबद्दल सर्व उपस्थितांनी तिथल्या व्यवस्थापनाला विचारणा केली.तसेच,तेथे उपस्थित सिनेमॅक्स थिएटरचे नियमित प्रेक्षक म्हणाले की आम्हाला हा चित्रपट बघायचा आहे यासाठी चित्रपट थिएटर मध्ये प्रदर्शित करावा.चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी व्यवस्थापनाला विनंती केली.निवेदन देण्यासाठी मालेगावातील सर्व भागातील प्रेक्षकवर्ग उपस्थित होता.व्यवस्थापन लवकरच या विषयावर निर्णय घेणार असून हा चित्रपट प्रदर्शित न केल्यास बऱ्याच प्रेषकवर्गाने सिनेमागृहाकडे कायमस्वरूपी पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने